Posts

Showing posts from May, 2017

बहीण दि. 06-05-2017

  बहीण कोण होईल माझी ताई मजला बहीण नाही......... ममतेचा सागर ताई वात्सल्य मूर्ती ताई भावंडांचा आधार ताई आईला समर्थ पर्यायही ताई........ घरी नसेल जेंव्हा आई तेंव्हा ताईच होते आई भावंडांसाठी कष्टणारी असते ताई भावंडांचे हट्ट पुरवते ताई............. जगात आपल्यावर जीव टाकणारी लहान मोठी शांत खोडकर कशीही आई- वडिलांमागे माया प्रेम देणारी एकतरी बहीण प्रत्येकाला असावी.... जरी देवाने दिले सर्वकाही बहिणीची उणिव सदा चित्ती राही कोण होईल माझी ताई मजला बहीण नाही............. सौ.सरिता एकनाथ कदम पोलादपूर, रायगड. मायाबहिणीची.. आसावल्या डोळ्यांनी दारात बहीण. उभी... असा निरागस तो चेहरा आठवतो नभी. दाराशी पावले वाजण्याची पाहे वाटुली अधिरा.. कधीकधी लालेलाल कधी गोड बोले चेहरा... बोले पाइचे पैंजण सुख तुझ्या असण्याचे.... मन आधीच खंतावे आठव सासरचे.. लाडकी माझी ताई तिच्याविन मी असेना. तिच्यासाठी मी तत्पर ओवाळितो पंचप्राणा... आईबाबा..माझे असे घरची सावली.. समाधान माहेरी पाहता माझी ताई सुखावली.. आज संपत्तीच्या लोभात  भाऊबहिणीचे वाद.. माझ्या ताईला हवे फक्त प्रे...

आठवण दि. 5-05-2017

आठवण  . . . . . . . . . . . . . . . . . . .  स्मृती जागल्याआठवणींच्या कळ्ळोल उठतो हृदयात असंख्य इंगळ्या विरहाच्या डसती एका क्षणात  दिवस किती ते सुंदर होते प्राजक्ताच्या बनातील भेटीचे प्रेम आपुले फुलत होते गुंफित हात हातात स्वप्ने माझी साधीच होती एक घरट अन दोन पिल्लं मायेच्या पंखाखाली ती सदा राहो सुखात नटून थटून तुझी वाट पहावी जवळ घेता नजर झुकावी हळूच माझ्या माळावीस तू बकुळ फुले केसात तुला इथले पसंत नव्हते दारिद्र्यातील लाचार जिणे हात जोडूनी केली विनवणी गेलास सोडूनी परदेशात वाट पाहुनी नयन थकले थकल्या नयनी अश्रू सुकले वाट पहाते मी अजुनही प्राण आणूनी डोळ्यात आठवतो तो दिवस मजला शृंगारानने मी नटले होते हळूच गजरा बकुळीचा माळलास माझ्या केसात दोघासवे धुके ही धुंद वहात होता वारा मंद साठवीत त्या सोनरी क्षणाना मोहरून गेले मनात आठवण येता सख्या तुझी व्याकुळ मी रे मनोमनी माझ्या सारखा आतुर आहे प्राजक्त उभा बनात चंद्रकांत कांबळे  आष्टा तुझ्या आठवांनी जग भारून जाते कधी कशी नकळत तुझी याद येते ।।धृ।। कसे भेटलो होतो ...

आई

आई    लेकराच्या संकटांची     ढाल म्हणजे आई..... समशेरीचा घाव झेलते ती आई........ रणरणत्या वाळवंटातील निर्झर म्हणजे आई....... जन्मताना यातना ही सोसणारी आई........ स्वतः जळून प्रकाशणारी वाट म्हणजे आई....... निस्वार्थ आणि निस्सीम भक्ती म्हणजे आई...... झेपावणाऱ्या पंखातील बळ म्हणजे आई....... बालकांच्या मुखातील बोल म्हणजे आई....... अंधाराला कापणारी पहाट म्हणजे आई........ स्वतः रडून सुखावणारे हास्य म्हणजे आई........ कुशीतल्या पदराची ऊब म्हणजे आई........ तहानलेल्यास जलाचा घोट म्हणजे आई....... भूकेल्याची शमलेली भूक म्हणजे आई......    डोक्यावरून फिरणारा आशीर्वाद म्हणजे आई...... पावसाची थंडगार सर म्हणजे आई.......... काव्यरचना सौ.चंदना कैलास उतेकर आई वाईट वाटून घेऊ नकोस   उदरात खुडलेली कळी आ ई   तुला आज विनवणी करते जरी सारलेस दूर मला   तरीही तुझ्यासाठीच झुरते तुला वजा केल्यावर आई माझ्यामध्ये काही न उरते मात्र  ...