आई
आई
लेकराच्या संकटांची ढाल म्हणजे
आई.....
समशेरीचा घाव
झेलते ती आई........
झेलते ती आई........
रणरणत्या वाळवंटातील
निर्झर म्हणजे आई.......
जन्मताना
यातना ही
सोसणारी आई........
सोसणारी आई........
स्वतः
जळून प्रकाशणारी
वाट म्हणजे आई.......
निस्वार्थ आणि निस्सीम
भक्ती म्हणजे आई......
भक्ती म्हणजे आई......
झेपावणाऱ्या पंखातील
बळ
म्हणजे आई.......
बालकांच्या
मुखातील
बोल
म्हणजे आई.......
अंधाराला
कापणारी
पहाट म्हणजे आई........
स्वतः
रडून सुखावणारे
हास्य म्हणजे आई........
हास्य म्हणजे आई........
कुशीतल्या पदराची
ऊब म्हणजे आई........
तहानलेल्यास जलाचा
घोट म्हणजे आई.......
भूकेल्याची शमलेली
भूक म्हणजे आई......
डोक्यावरून फिरणारा
आशीर्वाद म्हणजे आई......
पावसाची थंडगार सर
म्हणजे आई..........
काव्यरचना
सौ.चंदना कैलास उतेकर
आई वाईट वाटून घेऊ नकोस
उदरात खुडलेली कळी आई
तुला आज विनवणी करते
जरी सारलेस दूर मला
तरीही तुझ्यासाठीच झुरते
तुला वजा केल्यावर आई
माझ्यामध्ये काही न उरते
मात्र
सांगते तुला , आई
वाईट वाटून घेऊ नकोस....
यायच होत मला तुझ्या पोटी,
पाहायचं होतं जग तुझ्या डोळ्यांनी
खूप होती स्वप्ने पाहिली,
स्वप्नामधे खूप रमली
अवचित घडले काही
आणि सारी स्वप्ने
विरून गेली
मात्र सांगते तुला आई, वाईट वाटून घेऊ
नकोस.....
देवानं सांगितले होते जपून जा पोरी ,
माणसावर विश्वास ठेवू नकोस कधी
म्हटले मी कोणाचीच गरज मला नाही..,
तुझ्याहूनही प्रेमळ देवा आहे रे माझी आई...
मग तुझे प्रेम सांग आटले का गं आई??
मारून टाकताना मला दुःख का झाले नाही???
मात्र सांगते तुला आई, वाईट वाटून घेऊ
नकोस....
आई म्हणजे प्रेमाचा झरा,मायेचा सागर...
काहीही उगाचच लिहितात कवी
कोणी लिहिते ठेच लागली बाळाला तर रडत राहते
त्याची आई...
खूप शोधून पाहिले आई,
पण मला यातले काहीच दिसले नाही....
मात्र सांगते तुला आई, वाईट वाटून घेऊ
नकोस....
मुलीला गृहलक्ष्मी म्हणतात ना ग?
नवरात्रीला नऊ दिवस जागतात ना ग??
सावित्रीच्या लेकी म्हणून गौरव करतात ना ग???
तरीही वंशाच्या दिव्यासाठी आमचाच बळी घेतात का
गं??
मात्र सांगते तुला आई, वाईट वाटून घेऊ
नकोस....
एकदा येऊ दे ना मला तुझ्या पोटी
फक्त
आई हेच नाव आहे माझ्या ओठी...
आतल्या आत रडू नकोस...
गर्भात मला खूडू नकोस...
सांग ओरडून जगाला तू आहेस आई
मग काय फरक पडतो तुला मुलगा असो की मुलगी....
श्री.सुनिल भिमराज पवार
पोलादपूर, रायगड
आई
अंधारलेल्या राञीत जेव्हा,
काळोख मनात दाटतो...
आठवणीत हरवून आईच्या,
मी राञभर जागतो...
आभाळभर भरलेला अंधार,
गाञ गाञ गिळू लागतो...
दाटून येतात दाही दिशा,
अंधाराला अंधार मिळू लागतो...
कळत नाही वाट कुठली
कुठला रस्ता,कुठल गाव...
मनभर तेव्हा भरुन वाहत,
खोल मनातून आईच नाव...
तिचा चेहरा समोर दिसतो,
हात जाणवतो पाठीवर...
जाणीव होते जीवन जगायच,फक्तस्वतःच्या अटीवर...
त्या स्पर्शाची ऊब जाणवते,
आणि जगणं, जगणं होतं...
दुःखाची दुःखाला भुरळ पडावी,
या नजरेतून बघणं होतं...
पाठीवरच्या हाताने तेव्हा,
दुःखालाही अर्थ येतो...
ऊनपावसात तोच हात जेव्हा,
लढण्याचं सामर्थ्य देतो...
राकेश विष्णू सावंत
पोलादपूर, रायगड
माझी माऊली
उरी अभिमान दाटे
मज माझ्या माऊलीचा ||धृ||
राम प्रहरी तिने जाते कष्टाने ओढीले
पिलापिखरांच्यासाठी तिने दळणकांडीले
कुंकवाचा टिळा तिने अंदाजाने गोल केला
कधी चेहरा ना तिने आरशातही पाहिला
उरी हुंदका दाटला लिहीता पाढा हा कथेचा..१
पहाटेच्या पारी तिने चूल पेटवली
भारी जड कवलांची तिने डोई उचलली
कवलांच्या वजनाने तिचा चेहरा दबला
झपाझप चाले बघा जाई एकली रानाला
एकटीने उचलला हा भार संसाराचा...२
शिळा भाकरीचा तुकडा फडक्यात गुंडाळला
ताज्या भाकर्यांचा गठ्ठा लेकरांना राखीयला
रापलेला चेहरा तिचा भविष्याच्या भाकरीला
उपाशीपोटी तिचाविळा काळ्यामातीतचालला
ना खंत मनी कसली हसे चेहरा कारूण्याचा.३
शाळेला ना कधी गेली ना कधी अंक गिरवले
आकडेमोडीची हुशारी जीवनाने शिकवली
व्यवस्थापनाचे धडे आम्ही घरीच गिरविले
माऊलीच्या चेहर्याने मज खूप काही शिकवले
उरी ठेवला जपून ठेवामेहनतीचा,संस्कारांचा४
आज घर तिचे सजले नातवंडांनी फुलले
मुलगा-मुलगी समान असे तिने वाढवले
चार चाकी वाहनांनी तिचे अंगण सजले
हिमतीने लेकरांना सरकारी नोकर बनवले
झाले कष्टाचे हो चिज काळ शांत जगण्याचा५
नाव तिचे 'शांताबाई'तिच्या कामात चपळाई
नातवंडांच्या दाण्यापायी शेता राबण्यास जाई
स्वतः जाई ती शेतात ना कोणा जाऊ देई
उन्हातान्हात आजही खडे काढण्यास जाई
डोळे आसवे गाळती असा लेखाजोखा सर्वस्वाचा.....६
काव्यरचना
सौ.चंदना कैलास उतेकर
☘☘☘☘☘☘☘☘☘☘
माझी माय
ए माय माझ्यासाठी
किती तु धडपडते
माझ्याच सुखासाठी
एकाकी तु झुंजते
प्रेमामुळे तुझ्या मज
बापाची कमी न भासते
उरी दुःख साठवून
कशी तु जगते?
माझी खळगी भरण्यासाठी
उपाशी तु झोपते
आणून मज नविन कपडे
फाटकिच साडी कितीदा शिवते
जगासमोर आई कसे
लपवतेस ग रडू?
आई तुझे उपकार
कसे ग फेडू??
अनुराधा शिंदे -कांबळे
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
आई
काय किती सांगू
कशी माझी माऊली...
तिच्या पंखाच्या उबेची,
कुटुंबाला सावली...
बाबांनी घेतलेला
देशसेवेचा ध्यास...
तु भरवलास आम्हा,
माया ममतेचा घास...
नात्यातील कडूपणा,
काढलास गाळ...
ओवलीस सगळ्यांची,
एक सुंदर माळ...
किती धीटपणे सांभाळलीस
आई आणि बाबांची बाजू...
तुझ्या कर्तबगारी पुढे,
लागते नियती ही लाजू...
दुःखे सारी पेललीस
केलस एकटीच्या बळाने सर्व...
सगळ काही केलस,
दाखवलास जीतेपणी स्वर्ग...
आम्ही पाहतो जगात
काय कसे घडते...
तु तुझ्या सुनेला
मुलीसारखी जपते...
किती गावू लिहु
पोवाडे, अभंग, ओवी...
सरस्वती लाजेल गाताना,
तुझ्या गुणांची थोरवी...
केलीस मदत सगळ्यांचीच
अगदी होवून निस्वार्थ....
तु सांभाळलास सहज
प्रपंच आणि परमार्थ....
लेकरांची लग्न झाली
थाटला त्यांनी संसार...
प्रत्येक संकटात माञ
तुझा पावलोपावली आधार...
सासरी आल्यावर आता
भासते तुझी उणीव...
पावलोपावली मनाला
होते तुझी जाणीव...
तुच घराचा आधारस्तंभ
तुच घराचा कणा...
तुझ्याकडूनच शिकतो आम्ही
जगण्यात तुझी प्रेरणा...
तुच आमचा ईश्वर
तुच आमची शक्ती...
जन्मोजन्मी तुझ्याच
चरणी जागो भक्ती...
सौ.स्वप्नाली अजय शेडगे
काळेवाडी पुणे
🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
मी धिक्कार करतो अशा देवाचा
विश्वात अगणित तारे
त्यापैकी एक म्हणजे सूर्य
या सूर्याभोवती फिरणारा
एक पृथ्वी नावाचा ग्रह
असंख्य जीव पृथ्वीवरती
पैकी एक म्हणजे मानव
यांचीही संख्या अब्जामध्ये
त्यांपैकी एक माझी आई
जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे,
तुमच्या देवाने, आम्ही नसता,
कट केल्याप्रमाणे, माझ्या आईला,
माझ्यापासून हिरावलं असेल-
तर-
मी धिक्कार करतो अशा देवाचा!!
आयुष्यभर जीने कष्ट आणि कष्टच काढले
नव-यासाठी मुलाबाळांसाठी खपत राहिली
ओढगस्तीच्या आयुष्यात सुख शोधत राहिली
संसरासाठी काडी-काडी जमवित राहिली
मुलाबाळांच्या पोटाची काळजी करीत
स्वतः अर्धपोटी जगत राहिली
आता कुठे मुले मार्गी लागत होती
आता कुठे ती मुला-बाळा-नातवंडांसोबत
काही सुखाचे क्षण उपभोगत होती
ते तिचे सुख सहन न होवून जणू
तुमचा देव तिचे प्राण हरण करीत असेल-
तर-
मी धिक्कार करतो अशा देवाचा!!
सदा वैतागलेले म्हातारे, कटकट्या म्हाता-या
लेकी-बाळी-सुनांना शब्दांनी फटकारित असतात
त्यांच्या संसारात स्वतः विष कालवित असतात
कुणी दुर्धर आजाराने ग्रस्त होवून
कित्येक दिवस अंथरुणास खिळून असतात
आपल्या केवळ तशा त्या अस्तित्वाने
कुटुंबियांच्या सुखास झाकोळत असतात
आणि शब्दानेही कुणास न दुखावणा-या
शेवटच्या घटकेपर्यंत सारी कामे करणा-या
अगदी निरोगी असणा-या माझ्या आईला
केवळ दुष्टपणा करून, तुमचा देव,
भरल्या संसारातून उठवून नेत असेल-
तर-
मी धिक्कार करतो अशा देवाचा!!
मी धिक्कार करतो अशा देवाचा
विश्वात अगणित तारे
त्यापैकी एक म्हणजे सूर्य
या सूर्याभोवती फिरणारा
एक पृथ्वी नावाचा ग्रह
असंख्य जीव पृथ्वीवरती
पैकी एक म्हणजे मानव
यांचीही संख्या अब्जामध्ये
त्यांपैकी एक माझी आई
जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे,
तुमच्या देवाने, आम्ही नसता,
कट केल्याप्रमाणे, माझ्या आईला,
माझ्यापासून हिरावलं असेल-
तर-
मी धिक्कार करतो अशा देवाचा!!
आयुष्यभर जीने कष्ट आणि कष्टच काढले
नव-यासाठी मुलाबाळांसाठी खपत राहिली
ओढगस्तीच्या आयुष्यात सुख शोधत राहिली
संसरासाठी काडी-काडी जमवित राहिली
मुलाबाळांच्या पोटाची काळजी करीत
स्वतः अर्धपोटी जगत राहिली
आता कुठे मुले मार्गी लागत होती
आता कुठे ती मुला-बाळा-नातवंडांसोबत
काही सुखाचे क्षण उपभोगत होती
ते तिचे सुख सहन न होवून जणू
तुमचा देव तिचे प्राण हरण करीत असेल-
तर-
मी धिक्कार करतो अशा देवाचा!!
सदा वैतागलेले म्हातारे, कटकट्या म्हाता-या
लेकी-बाळी-सुनांना शब्दांनी फटकारित असतात
त्यांच्या संसारात स्वतः विष कालवित असतात
कुणी दुर्धर आजाराने ग्रस्त होवून
कित्येक दिवस अंथरुणास खिळून असतात
आपल्या केवळ तशा त्या अस्तित्वाने
कुटुंबियांच्या सुखास झाकोळत असतात
आणि शब्दानेही कुणास न दुखावणा-या
शेवटच्या घटकेपर्यंत सारी कामे करणा-या
अगदी निरोगी असणा-या माझ्या आईला
केवळ दुष्टपणा करून, तुमचा देव,
भरल्या संसारातून उठवून नेत असेल-
तर-
मी धिक्कार करतो अशा देवाचा!!
✍ डॉ. एस. पी. दोरुगडेमु.
बाची, पो. सोहाळे,ता. आजरा,
जि. कोल्हापूर
👩👧👦 आई 👩👧👦
(१)
"आई "तुझ्या लिखाणासाठी,
तुझ्या शब्दांच कर्ज घेतल.
त्यांना हवं तिथं,
हवं तस मांडल.
त्या मांडणीला जर,कोणी छान म्हटलं!
तर आई तुझ्या,फक्त शब्दांच कर्ज फिटल.
वनू
👩👧👦 आई 👩👧👦
(२)
आई तू गेली सोडून मला.
कुठे कुठे शोधू ग मी तुला.
मनाच भरकटन कुठेही जाई.
पायाची वणवण कुठेही नेई.
दिशाहीन मी मला सुकाणू नाही.
पाठिंबा असा ठोस कुठेच नाही.
तू तर रीत्या हातीच गेलीस.
मात्र तुझी माया सोबत नेलीस.
वनू
👩👧👦 आई 👩👧👦
(३)
आई आज असे वाटते,
तुझ्या जवळ येवून बसावे.१
तुझ्या मांडीवर डोके ठेवून,
शांत निजावे,खूप रडावे.२
तू नाही म्हणून मला,
शांत झोप येत नाही.३
तुझी सतत येणारी आठवण,
मला झोपूच देत नाही.४
अग,दिवस माझा सोबती,
पण रात्र वैरी होतात.५
त्या एकांतात तुझ्या,
चंद्र तारे साथ देतात.४
प्रत्येक तुटल्या ताऱ्यांकडे,
मी एकच मागणे मागते.५
देवा,कधीच मायलेकरांचे,
तोडू नको नाते.६
वनश्री पाटील जालना
Comments
Post a Comment