आठवण दि. 5-05-2017
आठवण
. . . . . . . . . . . . . . . . . . .स्मृती जागल्याआठवणींच्या
कळ्ळोल उठतो हृदयात
असंख्य इंगळ्या विरहाच्या
डसती एका क्षणात
दिवस किती ते सुंदर होते
प्राजक्ताच्या बनातील भेटीचे
प्रेम आपुले फुलत होते
गुंफित हात हातात
स्वप्ने माझी साधीच होती
एक घरट अन दोन पिल्लं
मायेच्या पंखाखाली ती
सदा राहो सुखात
नटून थटून तुझी वाट पहावी
जवळ घेता नजर झुकावी
हळूच माझ्या माळावीस तू
बकुळ फुले केसात
तुला इथले पसंत नव्हते
दारिद्र्यातील लाचार जिणे
हात जोडूनी केली विनवणी
गेलास सोडूनी परदेशात
वाट पाहुनी नयन थकले
थकल्या नयनी अश्रू सुकले
वाट पहाते मी अजुनही
प्राण आणूनी डोळ्यात
आठवतो तो दिवस मजला
शृंगारानने मी नटले होते
हळूच गजरा बकुळीचा
माळलास माझ्या केसात
दोघासवे धुके ही धुंद
वहात होता वारा मंद
साठवीत त्या सोनरी क्षणाना
मोहरून गेले मनात
आठवण येता सख्या तुझी
व्याकुळ मी रे मनोमनी
माझ्या सारखा आतुर आहे
प्राजक्त उभा बनात
चंद्रकांत कांबळे आष्टा
तुझ्या आठवांनी
जग भारून जाते
कधी कशी नकळत
तुझी याद येते ।।धृ।।
कसे भेटलो होतो
किती बोललो होतो
बघता बघता दोघे
कसे गुंतलो होतो
त्या धुंद क्षणांचा
मन ठाव घेते ।।१।।
त्या तुझ्या हसण्याने
अन कधी रुसण्याने
काही कारण नसता
हळवे मग होण्याने
तेव्हाचे जग माझे
स्वच्छंद बेधुंद होते ।।२।।
आता विरहची उरला
आता उदासी उरली
एकटेपणा हा आला
आशा सारीच सरली
तरी हृदय तुझ्याकडे
अजुनी धाव घेते ।।३।।
✍ डॉ. एस. पी. दोरुगडे
🥀 आठवण 🥀
तुला आता मी कायमची सोडून जाईल
माझी कमी कधीतरी तुलाही भासेल
बघ तुलाही माझी आठवण येईल
तुझ्यावरच प्रेम जिवापाड केल
पण तुला नाही ते कधी कळलं
बघ तुलाही माझी आठवण येईल
तुझ्याविना मन नाही कधी रमल
माझ्याविना तुही कधी उदास होशील
बघ तुलाही माझी आठवण येईल
तुझ्याविना कधी उचलले नाही पाऊल
तुला आता माझी लागणार नाही चाहूल
पण ..बघ तुलाही माझी आठवण येईल
तुझ्या आवडीचे रोपटेही प्राणपणाने जपल
माझ्याविना तेही आता सुकून जाईल
तेव्हा ..बघ तुलाही माझी आठवण येईल
तुझ्या आठवणीने मन माझं भरुन जाईल
एकांतात असताना तुही कधी रडशील
बघ तुलाही माझी आठवण येईल
तुझ्यावाचून जगणे मला कठिण होईल
तुझा मात्र मार्ग आता सोपा होईल
पण..तरिही ..बघ तुला माझी आठवण येईल !!
✍...अनुराधा शिंदे -कांबळे
आठवण
आठवण तुझी आणि माझी असते.
प्रेम आणि विरहाचीही कटू भासते.
आठवण असते त्या प्रत्येक क्षणाची.
किती ओतले मी तेथे त्या मनाची.
आठवते महाभारत,रामायण,गाथा.
चांगले काही न घेता टेकवला माथा.
आठवतात ते राजे शिवाजी थोरले. किल्यावर बैताडांनी नाव प्रेयसीचे कोरले.
आठवल ते हिरोशिमा,नागासाकी.
सत्तेसाठी बळी गेलेल्या निष्पापांची.
आठवण येत ना त्या क्रांती विरांची.
आताच्या बेशरम तरूण पिढीची.
आठवण येते अनेक हत्याकांडांची.
फक्त हातावर हात धरून बसण्याची.
आठवले गाईला कत्तलखानी पोहचवले.
मी फक्त आसवच तिच्यासाठी गाळले.
आठवतो मला फाशी घेणारा शेतकरी.
त्याच्या आत्महत्या कोणी मानकरी?
आठवतो मला बाँब बनवणारा हात.
कसूर कोणाचा!करतो नुसते घात.
आठवते मला ती अबला दीन नारी.
प्रत्येकीच्या मरणाची कथाच न्यारी.
आठवते झाशी,सिवित्री जिजाऊ,रमाई
आताची राहणी,तोकडी,बोडखी हीच खरी कमाई.
आठवण येते खूपच माझ्या आईची.
वचन दिल तिला सुसंस्कारी राहण्याची.
वनश्री पाटील जालना
उध्वस्त विराणी
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
गेली विरूनिया नाती
राहीले स्मरणाचे थवे
माझ्या अंधाऱ्या जगाला
तेच प्रकाशाचे दिवे
आता फाटली लक्तरे
माझ्या मनाच्या कुडीची
आता सोसवेना त्याला
हळु फुंकर वाऱ्याची
नाच नाच माझ्या मना
तुझ्या मनाच्या र उरी
थकलेल्या शरीराला
कशी मिळेल उभारी
विटल्या अपेक्षा नी
नासल्या रे आशा
फक्त राहिल्या आठवणी
माझ्या उध्वस्त विराणी
उषा सचिन खोपडे (देशमुख)
🌹तुझी आठवण 🌹
रिमझिमणा-या पावसात
येई आठवणींना पूर
मनात माजे काहूर
तुझ्या आठवणीने
लागे भेटीची ओढ
तुजसाठी होई मन वेड
वा-याची झुळूक
वाहे घेऊनि आठवणी
दाटल्या होत्या ज्या मनी
रातरात सजना
तुझ्या आठवणींत रमते
तु येण्याच्या आशेवरच जगते
तुझी आठवण म्हणजे
मायेची साठवण
तुझ्या प्रेमात हरवलेले क्षण
तुझी आठवणच
झालंय माझ जीवन
त्याविना जगणं म्हणजे मरण!!
✍...अनु
🌹🌹🌹🌹🌹🌹
तुझ्या आठवणींच्या छायेत जगतो आहे
भूतकाळाचे ढग पांघरून झोपतो आहे
.......एकटा आहे बराच काळ मी
भूतकाळात अडकलेला...
तुझ्यात गुंतलेला...
त्यातून सुटण्याचा प्रयत्नही न करणारा....
✍ डॉ. एस. पी. दोरुगडे
🍂🍁 आठवणी 🍁🍂
आठवणी ह्या येतच राहतात
लपवण्याचा प्रयत्नात ही
त्या उचंबळतच राहतात
लाटांवर लाटा आठवणींच्या
उसळतच राहतात
मनाच्या कोपऱ्यातूनही त्या
बाहेरच डोकावत राहतात
प्रियजनांच्या जुन्या गोष्टी
त्या सांगतच राहतात
अचानक कधीतरी त्या
बाहेर येऊ पाहतात
भूतकाळातूनही आठवणी
वर्तमानात येत राहतात
प्रेमळ सहवासाची एक
अंधुकशी आठवण देतात
खोल खोल ह्रदयातून
त्या वर येऊ पाहतात
अशा ह्या आठवणी
एक आनंद देऊन जातात
📚✒ विजयालक्ष्मी राऊत - गोरे
⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡
आठवण
अजूनही आठवते, त्या पहाटवेळी
रविवारचा दिवस, रात्र सरू लागली
पहाट होता होता काळरात्र हो झाली ||
आकाश होते शांत
चंद्र चांदण्याही खिन्न
कळ्या अबोल झालेल्या
भेदरून बिलगल्या
धरती माय रागावली
सारी सृष्टी भेदरली
तिचे रौद्ररूप पाहता जणू सारी कोलमडली............
पहाट होता होता काळरात्र हो झाली ||
माझी लेक चिमूकली
माझ्या कुशीत निजली
आचानकच उठली
अकांत तांडव करु लागली
काही केल्या शांत होईना
जोजवीता समजेना
तिचे अव्यक्त मन जणू काही सांगत होते
कोणास ठाऊक तिलाच का कळले होते
किल्लारी गाव तेंव्हा उध्वस्त झाले होते.........
सौ. सरिता एकनाथ कदम
पोलादपूर. रायगड.
🍁आठवणी🍁
आठवणींचा जीवन असे पडदा
मागे वळून पहावे अनेकदा।।
बालपणीचे ते सारे सवंगडी
खेळ आठवे तो विटी-दांडू ।।
वणीतली ती चिंचा-बोरे
जमत होती सारी पोरे।।
आंब्याचा तर भारी नाद
ऐकत नव्हतो कुणाचीच साद।।
पारावरच्या गप्पातील मस्ती
मिळणार नाही हो अशी सस्ती।।
रात्रीचे ते शुभ्र चांदणे
कुठे हरवलं कोण जाणे।।
मस्त होते लहान जीवन
कशाचीच नसे चिंता वणवण
कशास मोठे झालो आपण
मजेचे होते बालपण।।
सौ. निलांबरी घोलप.
🍁🍁 उध्वस्त विराणी 🍁🍁
🌵🌵🌵🌵🌵🌵🌵🌵🌵
गेली विरूनिया नाती
राहीले स्मरणाचे थवे
माझ्या अंधाऱ्या जगाला
तेच प्रकाशाचे दिवे
किती सोसली वादळे
मनबंध जोडताना
आता टोचते लेखणी
अक्षरांना तोडताना
जणु फाटली लक्तरे
माझ्या मनाच्या कुडीची
आता सोसवेना त्याला
हळु फुंकर वाऱ्याची
नाच नाच माझ्या मना
तुझ्या मनाच्या र उरी
थकलेल्या शरीराला
कशी मिळेल उभारी
विटल्या अपेक्षा नी
नासल्या रे आशा
चित्तरकथा जीवनाची
कोंदटल्या दाहीदिशा
सारे विरून तरी
फक्त राहिल्या आठवणी
स्वत्व राहीलेच नाही
माझ्या उध्वस्त विराणी
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
उषा सचिन खोपडे (देशमुख)
🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂
।।आठव ।।
आठवणीच्या दरीत
मन पाखराची हाक....
वळणावळणाचया वाटेवर
वाटे मनाला धाक ....
घनदाट रानवन
सळसळ करती पानं...
वार्यासंगे गाती सारे
तुझ्या आठवांच गाणं...
हिरव्या रानाच्या कुशीत
वार्या वादळाला जोर....
थकून दमून फांदीवर
बसला आठवांचा मनमोर....
अंगणातल्या मातीला
लागे कस्तुरीचा गंध....
मन पिसाट गंधासवे
लागे आठवांचा छंद ....
सुनीता शिंदे
बुधगाव
आठवण
रोजचे तुझे येणे जाणे
घर मनात माझ्या करून गेले
हृदयाच्या स्पंदनात
वेडे मन मात्र हरवून गेले.
आयुष्याच्या वळणावरती
प्रेमाचा आधार तू दिला.
भेटलो मात्र एकदाच
तरीही आयुष्याला माझ्या रंग आला.
आठवणीत राहीले शब्द
अन् रंग तुझ्या प्रेमाचे
विसरता येणार नाहीत
क्षण ते आपल्या भेटीचे.
कॉलेज संपले अन्
झाला आपला दुरावा
आठवणीच्या शिदोरीचा
राहीला फक्त पुरावा.
नितीन गाडे.
जि.प.प्रा.शाळा,वाफेगांव.
ता.माळशिरस जि.सोलापूर.
आठव
आठवे तुझी
हळूवार चाहूल
धुंद पाऊल
आठव येते
अशा कातरवेळी
नि सांजवेळी
आठवे मज
तुझा हास्यविनोद
मनी आल्हाद
आठवे सख्या
हास्य मनमुराद
मज आनंद
आठवतो रे
प्रेमळ सहवास
नितळ आस
आठवती रे
प्रेमाच्या गुजगोष्टी
भाग्य ललाटी
आठवे तुझी
मनमोहक अदा
मी तर फिदा
दिलखुलास
तुझी सारी जिंदगी
मना ताजगी
📚✍🏻विजयालक्ष्मी राऊत -गोरे
आठवण
ओंजळीत प्राजक्त धरताना गार होतो.
तुझ्या आठवणींचा ह्रदयास भार होतो.
विसरता तुला परी तुझाच भास आहे.
आठवणींच्या चांदण्यांचा खुपणारा हार होतो
विरहाच्या काळोख्या डोहात खोल जाता
ह्रदयास खंजिराचा हलकेच वार होतो
तुझ्या मिलनाची आशा धुसर होता
जितेपणीच सखे मी चारचौघात ठार होतो.
सौ. चंदना कैलास उतेकर
..........आठवण...............
अस कस कठोर वागू शकतोस तू?
न बोलताच माझ्याशी राहू शकतोस तू?
प्राण कंठाशी आणून वाट पाहिली आज तुझी,
मला न सांगताच कसा इतका दूर जाऊ शकतोस तू?
डोळ्यांतल्या आसवांनीच हे शब्द शिंपले आज,
हव तर माझा प्राण मागू शकतोस तू.....
तुझ्याशिवाय दिवस माझा कसा गेला काय सांगू,
सृष्टीतील नजारे कसे माझ्याशिवाय पाहू शकतोस तू?
अळवावरचं पाणी बनणं इतकं सोप असावं का तुझ्यासाठी,
विरहातील वेदनामयी आठवणीकशा साहू शकतोस तू?
.......................चंदना...............
हा दिवस आठवणीत ढळलेला,
ही रात्रही अर्धीच सरलेली...
अर्ध्याच रात्री अर्ध्या चंद्राला
चांदण्यांची मिठी पडलेली...
..... राकेश.....
आठवण
तुझ नांव आठवल की कविताही सुचतात.
आठवण नसल्याने तर ह्रदयातील स्पंदने स्थिरावतात.
तुझ्या आठवणीने येतो बहर वेली,फुलांना.
आठवण नसल्याने तर कहर येतो ग्रिष्माला.
तुझ्या आठवणीने तर नदी नाले गातात.
आठवण नसल्याने तर ते उगमही आटतात.
तुझ्या आठवणीने तर आकार येतो जीवनाला.
आठवण नसल्याने तर देह जातो सरणाला.
म्हणून मी म्हणते की तू माझ्या सोबतच रहा.
निसर्गातील सुष्ट्री सौंदर्य माझ्या सोबत पहा.
वनश्री पाटील जालना
चारोळी
आठवण येता तुझी
मन सैरभैर होते,
अर्धवट राहिलेल्या खेळाच्या
पूर्णत्वाची आस लागते.
नितीन गाडे.
Comments
Post a Comment