बहीण दि. 06-05-2017
बहीण
कोण होईल माझी ताई
मजला बहीण नाही.........
ममतेचा सागर ताई
वात्सल्य मूर्ती ताई
भावंडांचा आधार ताई
आईला समर्थ पर्यायही ताई........
घरी नसेल जेंव्हा आई
तेंव्हा ताईच होते आई
भावंडांसाठी कष्टणारी असते ताई
भावंडांचे हट्ट पुरवते ताई.............
जगात आपल्यावर जीव टाकणारी
लहान मोठी शांत खोडकर कशीही
आई- वडिलांमागे माया प्रेम देणारी
एकतरी बहीण प्रत्येकाला असावी....
जरी देवाने दिले सर्वकाही
बहिणीची उणिव सदा चित्ती राही
कोण होईल माझी ताई
मजला बहीण नाही.............
सौ.सरिता एकनाथ कदम
पोलादपूर, रायगड.
मायाबहिणीची..
आसावल्या डोळ्यांनी दारात बहीण. उभी...
असा निरागस तो चेहरा आठवतो नभी.
दाराशी पावले वाजण्याची पाहे
वाटुली अधिरा..
कधीकधी लालेलाल कधी गोड बोले चेहरा...
बोले पाइचे पैंजण सुख तुझ्या असण्याचे....
मन आधीच खंतावे आठव सासरचे..
लाडकी माझी ताई तिच्याविन मी
असेना.
तिच्यासाठी मी तत्पर ओवाळितो पंचप्राणा...
आईबाबा..माझे असे घरची सावली..
समाधान माहेरी पाहता माझी
ताई सुखावली..
आज संपत्तीच्या लोभात
भाऊबहिणीचे वाद..
माझ्या ताईला हवे फक्त
प्रेम निर्विवाद.
देवा असेच राहु दे आम्हा भावंडांचे प्रेममाया
दीर्घायू लाभो ताईला.हीच
विनंती गणराया..
सौ .नम्रता नरेंद्र संखे.
बहिण म्हणजे ....
बहिण म्हणजे
माया,ममता
जणू काही
आपुलकिची सरिता
बहिण म्हणजे
घरभर नाचणारा मोर
सर्वांचे मन ओळखणारा
असते चित्तचोर
बहिण म्हणजे
उन्हातील सावली
आई नसताना
मायेची माऊली
बहिण म्हणजे
भावाची सखी
जिला पाहवत नाही
भाऊ असलेला दुःखी
बहिण म्हणजे
घरभर फिरणारं फुलपाखरु
जीवन ओवाळून टाकणारा
सौख्याचा सागरु
बहिण म्हणजे
मायेची खाण
सर्वांचाच प्राण
घराण्याची जान!!
✍...अनुराधा शिंदे -कांबळे
इच्छा पूर्ण
एकदा देव माझ्या स्वप्नात आला
त्याला मी एक प्रश्न विचारला
सारे दिलेस मला बहिण नाही दिली?
तेवढीच एक उणीव का रे ठेविली?
देव म्हणाला मैत्रिणींशी वाग प्रेमाने
मैत्री कर त्यांच्याशी नितळ मनाने
त्यांनाच तुझे प्रेम माया भरपूर दे
एक काय मागतेस हजार बहिणी घे
मी ही वागले सर्व सख्यांशी सख्याने
जवळ आल्या त्या माझ्याशी नात्याने
रक्ताच्या नात्यापेक्षा आमचे नाते सुंदर
आमच्यात आहे एकी माया अपरंपार
देवाचे मानते आभार मला मैत्रीणी दिल्या
कळलेच नाही त्या माझ्या बहिणी कधी झाल्या
.विजयालक्ष्मी राऊत - गोरे
जिंती ,करमाळा, सोलापूर
माय माझी ताई
. . . . . . . . . . . . . . .
जेव्हा गेली सोडूनी आई
ताई तू झालीस माई
पाखर मायेची घालुनी
जगविलेस मला तू प्रेमानी
अपार कष्ट तू सोसुनी
उणे न केलेस या जीवनी
रातंदिन तुझं खंत होती
कसा संभाळू हा माणिक मोती
असा जपलास तू मनात
जसा हिरा सोनेरी कोंदनात
संस्कारला कुठे ना उणी
रूजविले असे बीज मनी
स्वार्थ कधी शिवला नाही
रिती तू सर्वस्व देवूनी
हाैस माैज स्वताची विसरूनी
ठेवीले तू मजला आनंदी
रक्ताचे तू करूनी पाणी
फुलविलेस माझ्या जीवनी
कसे फिटावे ऋण तुझे
दैवता स्विकारावे वंदन माझे
. . . . . . . . . . . . . . .
चंद्रकांत कांबळे आष्टा
माझी ताई
नाजूकशी छान
गोरी गोरी पान ..
रुपाची खाण
माझी ताई...
प्रेमाची पाखर..
सुखाचा सागर..
स्वर्गाचे दार
माझी ताई...
आईनंतर ताई
झाली आमची आई
बाळाची अंगाई
माझी ताई...
स्नेहमय दीपक
जणू सांजवात
देवत्वाची मूर्ती
माझी ताई....
सुनिता शिंदे
बुधगाव ..
बहिण
बहिणीचे आईवडिलांवर असत प्रेम वेडं
तिला कायमच असते माहेरची ओढ
बहिणीची भावावरिल माया कधी सुटत नाही
भावासाठी जीव तिचा कायम तुटत राही
वहिनी येण्याआधी असते घरची कारभारिण
ती आल्यावर मात्र बाजूला होते स्वतःहून
लग्नाआधी जात नाही कोठे घर सोडूनि
लग्नानंतर होते ती दोन दिवसांची पाहूणी
बहीण घरातील सुख दुःखाचे share it असते
कधी गुपित उघडून दाखवणारे facebook असते
बहिणी बहिणींमधील माया तर कधी संपत नाही
त्यामुळे बहिण नाही याचीच खंत वाटत राही 😔
अनु
कोण होईल माझी ताई
मजला बहीण नाही.........
ममतेचा सागर ताई
वात्सल्य मूर्ती ताई
भावंडांचा आधार ताई
आईला समर्थ पर्यायही ताई........
घरी नसेल जेंव्हा आई
तेंव्हा ताईच होते आई
भावंडांसाठी कष्टणारी असते ताई
भावंडांचे हट्ट पुरवते ताई.............
जगात आपल्यावर जीव टाकणारी
लहान मोठी शांत खोडकर कशीही
आई- वडिलांमागे माया प्रेम देणारी
एकतरी बहीण प्रत्येकाला असावी....
जरी देवाने दिले सर्वकाही
बहिणीची उणिव सदा चित्ती राही
कोण होईल माझी ताई
मजला बहीण नाही.............
सौ.सरिता एकनाथ कदम
पोलादपूर, रायगड.
मायाबहिणीची..
आसावल्या डोळ्यांनी दारात बहीण. उभी...
असा निरागस तो चेहरा आठवतो नभी.
दाराशी पावले वाजण्याची पाहे
वाटुली अधिरा..
कधीकधी लालेलाल कधी गोड बोले चेहरा...
बोले पाइचे पैंजण सुख तुझ्या असण्याचे....
मन आधीच खंतावे आठव सासरचे..
लाडकी माझी ताई तिच्याविन मी
असेना.
तिच्यासाठी मी तत्पर ओवाळितो पंचप्राणा...
आईबाबा..माझे असे घरची सावली..
समाधान माहेरी पाहता माझी
ताई सुखावली..
आज संपत्तीच्या लोभात
भाऊबहिणीचे वाद..
माझ्या ताईला हवे फक्त
प्रेम निर्विवाद.
देवा असेच राहु दे आम्हा भावंडांचे प्रेममाया
दीर्घायू लाभो ताईला.हीच
विनंती गणराया..
सौ .नम्रता नरेंद्र संखे.
बहिण म्हणजे ....
बहिण म्हणजे
माया,ममता
जणू काही
आपुलकिची सरिता
बहिण म्हणजे
घरभर नाचणारा मोर
सर्वांचे मन ओळखणारा
असते चित्तचोर
बहिण म्हणजे
उन्हातील सावली
आई नसताना
मायेची माऊली
बहिण म्हणजे
भावाची सखी
जिला पाहवत नाही
भाऊ असलेला दुःखी
बहिण म्हणजे
घरभर फिरणारं फुलपाखरु
जीवन ओवाळून टाकणारा
सौख्याचा सागरु
बहिण म्हणजे
मायेची खाण
सर्वांचाच प्राण
घराण्याची जान!!
✍...अनुराधा शिंदे -कांबळे
इच्छा पूर्ण
एकदा देव माझ्या स्वप्नात आला
त्याला मी एक प्रश्न विचारला
सारे दिलेस मला बहिण नाही दिली?
तेवढीच एक उणीव का रे ठेविली?
देव म्हणाला मैत्रिणींशी वाग प्रेमाने
मैत्री कर त्यांच्याशी नितळ मनाने
त्यांनाच तुझे प्रेम माया भरपूर दे
एक काय मागतेस हजार बहिणी घे
मी ही वागले सर्व सख्यांशी सख्याने
जवळ आल्या त्या माझ्याशी नात्याने
रक्ताच्या नात्यापेक्षा आमचे नाते सुंदर
आमच्यात आहे एकी माया अपरंपार
देवाचे मानते आभार मला मैत्रीणी दिल्या
कळलेच नाही त्या माझ्या बहिणी कधी झाल्या
.विजयालक्ष्मी राऊत - गोरे
जिंती ,करमाळा, सोलापूर
माय माझी ताई
. . . . . . . . . . . . . . .
जेव्हा गेली सोडूनी आई
ताई तू झालीस माई
पाखर मायेची घालुनी
जगविलेस मला तू प्रेमानी
अपार कष्ट तू सोसुनी
उणे न केलेस या जीवनी
रातंदिन तुझं खंत होती
कसा संभाळू हा माणिक मोती
असा जपलास तू मनात
जसा हिरा सोनेरी कोंदनात
संस्कारला कुठे ना उणी
रूजविले असे बीज मनी
स्वार्थ कधी शिवला नाही
रिती तू सर्वस्व देवूनी
हाैस माैज स्वताची विसरूनी
ठेवीले तू मजला आनंदी
रक्ताचे तू करूनी पाणी
फुलविलेस माझ्या जीवनी
कसे फिटावे ऋण तुझे
दैवता स्विकारावे वंदन माझे
. . . . . . . . . . . . . . .
चंद्रकांत कांबळे आष्टा
माझी ताई
नाजूकशी छान
गोरी गोरी पान ..
रुपाची खाण
माझी ताई...
प्रेमाची पाखर..
सुखाचा सागर..
स्वर्गाचे दार
माझी ताई...
आईनंतर ताई
झाली आमची आई
बाळाची अंगाई
माझी ताई...
स्नेहमय दीपक
जणू सांजवात
देवत्वाची मूर्ती
माझी ताई....
सुनिता शिंदे
बुधगाव ..
बहिण
बहिणीचे आईवडिलांवर असत प्रेम वेडं
तिला कायमच असते माहेरची ओढ
बहिणीची भावावरिल माया कधी सुटत नाही
भावासाठी जीव तिचा कायम तुटत राही
वहिनी येण्याआधी असते घरची कारभारिण
ती आल्यावर मात्र बाजूला होते स्वतःहून
लग्नाआधी जात नाही कोठे घर सोडूनि
लग्नानंतर होते ती दोन दिवसांची पाहूणी
बहीण घरातील सुख दुःखाचे share it असते
कधी गुपित उघडून दाखवणारे facebook असते
बहिणी बहिणींमधील माया तर कधी संपत नाही
त्यामुळे बहिण नाही याचीच खंत वाटत राही 😔
अनु
प्रेमाचा सागर ||सुखाची सरीता ||
मायाळू ममता ||ताई माझी ||१||
विजयालक्ष्मी
बहिण
मला नाही बहिण काय लिहू,
होते घालमेल.
सारे भारतीय बांधव माझे
प्रतिज्ञेत लिहिलेल.
असे आईच्या उदरी,
भावडं आम्ही तिघ.
कळत नव्हते तेव्हा,
कोबंडयावानी झुंज.
झालो केंव्हा शहाने,
कळलेच नाही.
संकटी धावे सारे,
घासही काढून देयी.
दादा जणू माझा तेंव्हा,
मोठी बहीणच.
तयारी पासून माझी,
वेणी फणीही करीच.
बघते इतर ठिकाणी,
काय मी पाहते.
लहान भावासाठी बहिण,
शिक्षण सोडते.
भावाच्या रुपाने ती त्याची,
लेक सांभाळते.
कोणतेही सण,संकट ती,
धावतच जाते.
आई नाही तरी माझा,
दादा बने आई.
सुख,दूख सारी,
दादा वाटून घेई.
बहिणीची उणीव दादा,
भरुन काढी!
माझे आयुष्य ही हे,
माझ्या दीदी साठी.(दादा)
वनश्री पाटील जालना
बहिण
बहिण म्हणजे काय. ?
एक निरागस नातं
ना त्यात कसलाही स्वार्थ
ना कसली अपेक्षा
ना हेवेदावे ना तुलना
बहिण म्हणजे एक मनमोकळं शेअरिंग ....
गप्पांच व्यासपीठ, आणि एकमेकींच केअरिंग
बहिण म्हणजे एक अनामिक ओढ ,भावभावनांची अनोखी गुंफण
बहिण म्हणजे दु:खावरील फुंकर ,आनंदातील वाटा
जीवनाच्या वाटेवर मार्ग दाखवणारी एक विश्वासू साथ 👏👏
---------वैशाली कुंजीर
ऊरुळीकांचन पुणे
अभंगासम रचना
माझी बहिण
प्रेमाचा पाझर |वात्सल्य सरीता ||
मायाळू ममता |तिची असे ||
माझीया घरात |बहिणीची माया ||
आम्हावरी छाया| तिची असे||
आम्हा साठी कष्ट| तीच करी सदा ||
प्रेमाचा कायदा |तिचा असे ||
आई घरी नसे |तीच होई आई ||
माय माझी होई |तीच जणू ||
आम्हा भावंडात |तीच असे मोठी ||
आधाराला काठी| तीच असे ||
माझी ती बहिण |मनाने निर्मळ ||
असे ती प्रेमळ |तीच खास ||
. विजयालक्ष्मी राऊत - गोरे
जिंती ,करमाळा ,सोलापूर .
ताई
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
थकलेल्या पायांना विसावा
दमलेल्या मनास दिसावा
जिव्हाळयाचा एक दिलासा
ताई तो तुझा चेहरा असावा ।धृ ।
एक छोटीशी दुनिया आपली
बालपणीच्या आठवणीची
भांडीकुंडी अन् चुळबोळकी
भावला_भावलीच्या गठबंधनाची
चिमण्या दातांचा खाऊ अर्धा
ताई तो तुझ्या हातचा
किती मधुर घास भरवशी
खेळ रंगे भातुकलीचा
येई आसवांच्या पाऊस सरी
आठवांच्या जाता घरी
ताई पुन्हा परतून येशील का?
परी बनून माहेरच्या दारी.
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
उषा सचिन खोपडे (देशमुख)
खूप छान शब्द आहेत
ReplyDeleteखूपच सुंदर
ReplyDelete